LOKSANDESH NEWS
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह अनेकांचा 23 मार्चला अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार
- नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील मोठे नाव असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्षाकडून नायगाव विधानसभा निवडणूक लढविलेल्या
डॉ. मीनल खतगावकर, नांदेड दक्षिणचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह अनेक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, यांचा येत्या 23 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील नर्सी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली