|LOKSANDESH NEWS
रस्ता लूट करणाऱ्यांना पोलिसांनी अवघ्या 24 तासात केले जेरबंद
- रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि.१६ मार्च रोजी अभिजान खान व्यवसाय-मिक्सर मशिन विक्री ही त्यांच्या मोटार सायकलवर मिक्सर मशिन विक्रीसाठी गेलेले असतांना वेल्हाने ते मोरशेवडी रस्त्यावरील बंद पडलेल्या एका कारखान्या जवळ दोन अनोळखी लोकांनी त्यांची मोटार सायकल अडवून तक्रारदाराच्या जवळील 1600 रुपयांचे मिक्सर मशिन जाणि 13 हजार 600 रुपये असे एकुण 15 हजार 200 रुपयाचे माल तक्रारदारास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून जबरीने चोरून नेला.
या घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासात धुळे तालुक्यातील मोरशेवडी गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर ईश्वर भील यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान त्याच्याकडील 14 हजार 200 रुपये पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी यावेळी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली