LOKSANDESH NEWS
गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल
उन्हाची चाहूल लागताच बाजारात शीतपेय, कुलर दुकाने फुलले आहेत. यासोबतच उन्हातून आल्यानंतर तहान भागवण्यासाठी मठातील पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे.
यामुळे गरिबांचे फ्रिज सध्या हात गाडीवर घेऊन गल्लोगल्ली विक्रिते फिरताना दिसत आहेत. माठ घेण्यासाठी बाजारात नागरिक दिसत आहेत.
माठांची मागणी लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर मध्ये गुजरात, मध्यप्रदेश यासह इतर राज्यातून माठ दाखल झाले आहेत.
माठांची मागणी वाढली असली तरी भाव वाढल्याने व्यवसायावर काही अंशी परिणाम होत असल्याचे विक्रेते सांगतात
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली