LOKSANDESH NEWS
संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष, 400 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा भाविकांसाठी खुला
- संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीजे निमित्त पंढरपुरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहुकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, पादुका आणि अभंगाच्या हस्तलिखिताची वही असा 400 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केला आहे.
यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने या दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखिते भाविकांना पाहायला मिळत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.