राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुलुंड मध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
मुलुंड मध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आले. यावेळी आगामी पालिका निवडणुकांमध्ये मुलुंड मधून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करावेत अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मुलुंड मधील सहाच्या सहा प्रभाग क्षेत्रात भाजपचेच नगरसेवक आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून देखील काही जागांवर दावा केला जातोय.
त्यामुळे भविष्यात येथील जागा वाटपाने वरून तिढा निर्माण होणार आहे. दरम्यान, ज्या प्रभागांमध्ये ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्या प्रभागांमध्ये जागा वाटपाच्या दरम्यान चर्चा होईल असे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी सांगितले
. या मेळाव्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.