LOKSANDESH NEWS
राजापूर तालुक्यात उत्साहात रमजान ईद साजरी, पोलिसांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये रमजान ईद चा उत्साह दिसून आला.
ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राजापूर शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजापूर शहरातील जामा मशिदी बाहेर देखील पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
यावेळी पोलिसांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी प्रार्थनास्थळावर गर्दी होत आहे. एकंदरीत जिल्ह्यामध्ये रमजान ईदचा उत्साह दिसून येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली