LOKSANDESH NEWS
अंडरग्राउंड विजेच्या केबलला अचानक लागली आग
छत्रपती संभाजी नगर पुलाच्या बाजूला महावितरणाच्या पोल कडे जाणाऱ्या एका अंडरग्राउंड केबलला सकाळी अचानक आग लागली. फटाक्यांसारखा मोठा आवाज, आगीचे लोळ उठत होते. हे दृश्य पाहून आसपासचे नागरिक रस्त्याने ये-जा करणारे थांबले.
सकाळची वेळ असल्यामुळे मंडी मध्ये जाणाऱ्या किंवा फिरण्यासाठी निघणाऱ्या नागरिकांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना फोन केला.
टाऊन हॉल ओवर ब्रिजच्या बाजूला महावितरणाच्या केबलला आग लागली,
परिसरातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण केबल जळून खाक झाली.