कल्याणमध्ये चिकनघर परिसरात पाणदिवड सापाची १७ पिल्ले आढळली

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कल्याणमध्ये चिकनघर परिसरात पाणदिवड सापाची १७ पिल्ले आढळली

                                                            LOKSANDESH NEWS 




 कल्याणमध्ये चिकनघर परिसरात पाणदिवड सापाची १७ पिल्ले आढळली, 

सर्पमित्रांनी सुरक्षितपणे केली सुटका





 कल्याणच्या चिकनघर परिसरात राहणारे तुषार खापरे यांच्या घराबाहेर वारंवार साप आढळत असल्याने त्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी शोध घेतला असता तब्बल १७ पाणदिवड सापाची पिल्ले आढळून आली. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि निसर्गमित्र नरेंद्र भिवंडीकर यांनी हे साप सुरक्षितरित्या पकडून, शासकीय सोपस्कार पूर्ण करून योग्य पाणथळ ठिकाणी सोडले.



 पाणदिवड हा बिनविषारी असला तरी चिडखोर स्वभावाचा असून, त्याचा दंश झाल्यास धनुर्वातासारखी लक्षणे दिसू शकतात. पूर्वी नद्यांमध्ये आढळणारा हा साप शहरीकरणामुळे आता सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये दिसू लागला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत असे साप थंड जागेच्या शोधात घराच्या परिसरात येतात.



 नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली