पत्नी व प्रियकर या दोघांनी मिळून केली पतीची हत्या
दिनांक 18 मार्च 2025 उत्तर प्रदेशातल्या मेरठच्या इंदिरानगर परिसरात सौरभ राजपूत चा भाऊ राहुल आपल्या भावाला भेटण्यासाठी आला त्यावेळी सौरभच्या घराला कुलूप होते त्यामुळे राहुलने सौरभ ला फोन केले पण त्याचा फोन बंद येत होता म्हणून राहुलने सौरभ ची बायको मुस्कानला फोन केला तेव्हा तिने फोनवर उडवाउडवीची उत्तर दिली आणि राहुलला संशय आला त्याने शेजारच्यांकडे चौकशी केली आणि सौरभच्या घरमालकांच्या मदतीने त्याने दरवाजा उघडला आणि तो घरात गेला तेव्हा घरात एका कोपऱ्यात ठेवलेल्या प्लास्टिकच्या ड्रम मधून कसला तरी घाणेरडा वास येत असल्याचे त्याला जाणवले त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला पोलिसांनी तो ड्रम बाहेर काढला तो ड्रम सिमेंट टाकून पूर्णपणे भरला होता तो ड्रम इतका जड होता की पाच ते सहा पोलिसांना मिळून तो ड्रम बाहेर काढावा लागला त्यातून खूप घाणेरडा वास येत होता शेवटी पोलिसांनी तो ट्रम्प फाडला आणि त्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली
त्या ड्रम मध्ये सौरभ राजपूतच्या शरीराचे पंधरा तुकडे आढळून आले.
मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने सौरभ ची हत्या नेमकी कशी केली
29 वर्षीय सौरभ राजपूत आणि 27 वर्षांच्या मुस्कान रस्तोगी या दोघांचा 2016 ला प्रेमविवाह झाला होता
या लग्नाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता त्यामुळे सौरभ आणि मुस्कान घरच्यांपासून वेगळे राहत होते ब्रह्मपुरीतल्या इंदिरानगर मध्ये मास्टर कॉलनी इथे एका भाड्याच्या घरात ते दोघे राहत होते 2019 मध्ये या दोघांना एक मुलगी झाली सुरुवातीची चार-पाच वर्ष मुस्कान आणि सौरभ सुखाचा संसार करत होते मात्र 2020 मध्ये सौरभला लंडनच्या एका मॉलमध्ये नोकरी लागली त्यामुळे मुस्कान आणि आपल्या मुलीला सोडून तो लंडनला गेला नंतर तिथेच त्याला मर्चंट नेव्हीतही नोकरी लागली त्यामुळे घरी मुस्कान आपल्या मुली सोबत एकटीच राहायची सौरभ वर्षातून एकदा दोघींना भेटण्यासाठी घरी यायचा 24 फेब्रुवारी 2025 ला सौरभ असाच इंदिरानगरमधील आपल्या घरी आला मुस्कान आणि सौरभने 28 तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला त्यांनी घरी पार्टी ही केली आपल्या मुली सोबत खूप एन्जॉय केल पण मुस्कानच्या डोक्यात त्यावेळी वेगळाच विचार सुरु होता आपला प्रियकर साहिल आणि आपल्या प्रेमात तिला सौरभ चा अडथळा वाटत होता त्यामुळे सौरभ चा काटा काढण्यासाठी हे दोघेही नोव्हेंबर 2023 पासून कट रचत होते सौरभ घरी आल्यानंतर त्या दोघांनी त्याला मारण्यासाठी प्लॅनिंग केले आपल्याला झोप लागत नाही असं सांगत मुस्कानं डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या डॉक्टरांनी दिलेल्या या गोळ्या तिने सौरभच्या दारूच्या बाटलीत मिक्स केल्या पण त्या रात्री सौरभ दारू प्यायला नाही आणि मुस्कान चा प्लॅन फसला पण 18 मार्चच्या रात्री सौरभ आपल्या आईने केलेले लोकी चे कोफ्ते घरी घेऊन आला आणि मुस्कानं तीच संधी साधत तिने ते कोफ्ते गरम करण्याच्या बाहण्याने त्यात झोपेच्या गोळ्या मिसळया आणि ते सौरभ ला खायला दिले जेवण झाल्यानंतर सौरभ ला कसंतरी व्हायला लागलं आणि तो बेशुद्ध झाला तेव्हा सौरभ ची मुलगी गाढ झोपली होती मुस्कानने वेळ वाया न घालवता आपला प्रियकर साहिलला फोन करून घरी बोलावून घेतलं आणि सौरभच्या हत्येचा प्लॅन सत्यात उतरवला मुस्कान आणि साहिलने आधीच दोन मोठे धारदार चाकू एक धारदार रेझर आणि पॉलिथिन बँक घरी आणल्या होत्या साहिल या दोघांनी मिळून सौरभच्या छातीत धारदार सुरा खुपसला आणि त्यातच सौरभ चा मृत्यू झाला.
पोलिसांनी राहुलच्या तक्रारीवरून मुस्कान आणि साहीलला ताब्यात घेतले आहे.
आपल्या वडिलांचे हत्या झाली आहे त्याची कोणतीही कल्पना नसलेली.
ती चिमुकली फक्त एकच गोष्ट सांगते पापा ड्रम है
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली