अंतराळवीर सुनिता विल्यम यांच्या कार्यास फलक रेखाटून कलाशिक्षक देव हिरे यांच्याकडून सलाम
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले.फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. इलॉन मस्क यांच्यास्पेसएक्स च्या ड्रॅगन यानाच्या साह्याने पृथ्वीवर परतले.
सुनिता विल्यम्स या मूळच्या भारतीय वंशाच्या असल्याने हा ऐतिहासिक प्रसंग तमाम भारतीयांना अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे आलेल्या बिकट संकटाला धैर्याने संयमाने साहसाने सामोरे जाण्याची प्रेरणा यातून निश्चितच मिळेल.
या संदर्भात येत्या तरुण विद्यार्थी -विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून चांदवड तालुक्यातील भाडगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक या शाळेच्या कलाशिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडू माध्यमातून शाळेच्या दर्शनी फलकावर सुनिता विल्यम्स यांच्या कार्याला सलाम केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली