LOKSANDESH NEWS
मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी ५० वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल
तामसा येथे मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी ५० वर्षीय आरोपी विरुद्ध तामसा पोलीस स्टेशन येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन येथे एका महिन्यात दोन पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
एकीकडे महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस बलात्कार, विनयभंग, छेडछाड, प्रकरण वाढतच चालले आहे
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/3/2025 रोजी रात्री उशीरा नंतर पोस्को अंतर्गत भा.द.वि.78 , पोस्को अंतर्गत 12, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे कांताराम नारायण शेकदार असून, पुढील तपास तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरोटे हे करत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली