LOKSANDESH NEWS
महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की, सातबारा कोरा करू. मात्र, आता अजित पवार यांनी कर्ज मुक्ती केली जाऊ शकत नाही तसेच शेतकऱ्यांनी आपले कर्ज भरावे असे वक्तव्य केल्यानंतर
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असून, आज चिखलीतील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलन केले आहे.
जोपर्यंत कर्जमाफ करणार नाही तोपर्यंत आम्ही पैसे भरणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी, फडणवीस म्हणतात सातबारा कोरा अजित म्हणतात पैसे भरा अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली