LOKSANDESH NEWS
गोंदियात राम मूर्ती स्थापन करत राम महोत्सव साजरा, नेहरू चौकात रामाची मूर्ती विराजमान
संपूर्ण देशात चैत्र नवरात्र उत्सव सुरू झाला असून, अशातच गोंदिया येथील विश्व हिंदू परिषद बजरंग तर्फे गोंदिया शहरातील नेहरू चौक या ठिकाणी राम, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
मागील 22 वर्षांपासून या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग तर्फे गुढी पाडावा ते राम नवनी पर्यंत या ठिकाणी उत्सव राम उत्सव साजरा केला जातो.
ज्या प्रमाणे गणपती, नवदुर्गा उत्सव साजरा केला जातो त्याच प्रमाणे राम उत्सव देखील साजरा केला जातो. या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ आरती करत रोज सायंकाळी आरती नंतर लोकांना महाप्रसाद देखील दिला जाते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली