LOKSANDESH NEWS
शिवसेनेच्या वतीने नांदेड शहरातील वाटसरुंसाठी थंड पानपोईची सुविधा उपलब्ध
नांदेड जिल्ह्यात तापमाणात झपाट्याने वाढ होत आहे. अशा वाढत्या तापमाणात थंड पेय आणि थंड पाण्याला मागणी वाढत आहे. ह्या दरम्यान नांदेड शहरातील वाटसरूंची तहान भागविण्यासाठी शिवसेनेचे सह-संपर्कप्रमुख दर्शनसिंघ सिद्धू यांच्या वतीने थंड पानपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पाणपोईचे उद्घाटन मुख्य ग्रंथी बाबा कश्मीरसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. मागील तेरा वर्षापासून नांदेड शहरातील वाटसरूंसाठी दर्शनसिंघ सिद्धू यांच्या वतीने थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.