दोन वर्षामध्ये वाळूची मागणी आणि पुरवठ्यामधला फरक दुर होईल - चंद्रशेखर बावनकुळे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दोन वर्षामध्ये वाळूची मागणी आणि पुरवठ्यामधला फरक दुर होईल - चंद्रशेखर बावनकुळे


LOKSANDESH NEWS 


 दोन वर्षामध्ये वाळूची मागणी आणि पुरवठ्यामधला फरक दुर होईल - चंद्रशेखर बावनकुळे 


ऑन वाळू धोरण 

- या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रीमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही, आणि ज्या ठिकाणी इसीची परवानगी मिळाली आहे त्याठिकाणी वाळूघाट लिलाव होतील 

- घरकुलांना ५ ब्रास रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जेवढी मागणी आहे तेवढा वाळू पुरवठा होईल असं वाळू धोरण करत आहोत 

- दगड खाणीवरुन तयार केलेली वाळू, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू क्रेशन प्रमोट करत आहोत 

- दोन वर्षामध्ये वाळूची मागणी आणि पुरवठा मधला फरक दुर होईल


ऑन बैठक 

- नागपूर जिल्ह्यात पाण्यासंदर्भात बैठक घेत आहोत, काल परवा ही बैठक झाली 

- शहराला पुरेसा पाणीपुरवठा होईल कुठे टॅकर पुरवण्याची परिस्थित येणार नाही याची काळजी घेतली जाईल 

- ३७ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे आणि नागपूर शहरामध्ये २२ तारखेला शहराची बैठक घेणार आहे यातून नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचा आरखडा तयार केलेला आहे 

- पाण्याची टंचाई येणार नाही याची काळजी घेणार आहे 


ऑन संजय राऊत 

- या राज्यात विकासाचे अनेक प्रश्न आहेत , संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राच लक्ष नाही माझं ही लक्ष नाही 

- जनतेला विकास पाहिजे, महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार कसं न्याय देईल जनतेला दिलेला संकल्प पुर्ण करता येईल यावर आमच लक्ष आहे 


ऑन माणिकराव कोकाटे

- कोर्टाने जी काही टिपण्णी केली असेल त्यावर मी वाचूनच बोलेन 



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली