LOKSANDESH NEWS
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी-पदमपुर शेतशिवरात 13 मार्च रोजी सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला होता.
याप्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. श्रवण सोनवणे (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृतक नरेश चौधरी व आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले. तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला.
दोघांनी मद्यप्राशन केले त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश बेसावध असताना मागून त्याच्या गळ्यावर धारधार कोयत्याने वार केले. यातच नरेश याचा मृत्यू झाला. काल सकाळी नरेशचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली आहे.
अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली