LOKSANDE4SH NEWS
| लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदाराने केली हत्या
- नवी मुंबईतील तुर्भे मधील एका लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या सोबत राहणाऱ्या पुरुषाने गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मागील पाच वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यामुळे ही महिला बळी पडली असल्याचे पोलिसांनी सांगितले
. अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली