LOKSANDESH NEWS
| बीडच्या गांजा तस्कराला कल्याणमध्ये अटक
कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका गांजा तस्कराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. शकील शेख या गांजा तस्कराचे नाव आहे.
तो मूळचा बीड जिल्ह्यातील राहणारा आहे. बीडमधून १२ किलो गांजा घेऊन कल्याणला आला असता कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकाजवळ त्याला गांजासह पोलिसांनी अटक केली आहे.
हा गांजा शकील कोणाला देणार होता ? शकील हा बीडचा असल्याने त्याच्या विरोधात आणखीन काही गुन्हे दाखल आहे का ? याचाही तपास पोलिस करीत आहेत. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २ लाख ४८ हजार रुपये आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली