| भिवंडी शहरातील तिनंबत्ती बाजार पेठेत रमजान ईद निमित्ताने शेवई खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी
भिवंडी शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यासाठी रमजान ईद मध्ये प्रथम पाहुणचार हा शेवईने करतात. त्यासाठी बाजार पेठेत शेवई खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत असून, कच्च्या मालाचा व तेलाचा, तुपाचा भाव वाढल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या रमजान ईद निमित्त शेवयाचे भाव कायम ठेवले आहेत.
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी या भावामध्ये कुठलीही तडजोड न करता शेवयाचे मागील वर्षीचेच भाव कायम ठेवले आहेत. तर शेवईमध्ये अनेक प्रकार असून, त्यात बनारशी भुणेली शेवई 160 रुपये किलो आहे. तसेच बनारशी शेवई 160 रुपये किलो आहे तर फेणी शेवई 240 रुपये किलो असून, सुथ फेणी शेवई 160 रुपये कलो आहे.
लड्डू शेवई 160 रुपये किलो असून, अहमदाबादी शेवई 50 रुपये पॅकेट आहे असा शेवईचा भाव असून रमजान ईद निमित्त नागरिक आपल्या आपल्या पद्धतीने शेवई खरेदी करीत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली