रोजगार सेवकांचे मानधन रखडल्याने ग्रामरोजगार सेवकांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
वर्ध्यात जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रोजगार सेवकांचे मानधन रखडले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या या रोजगार सेवकांची गावात महत्वाची भूमिका आहे. पण गेल्या पाच महिन्यांपासून मानधन रखडल्याने रोजगार सेवकांच्या दैनंदिन खर्च व पंचायत समिती मध्ये पोहचण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील रोजगार सेवकांनी एकत्र येत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी केली आहे. ऑक्टोबर 2924 पासून रोजगार सेवकांचे मानधन रखडले आहे.
यापूर्वी मंत्रालय स्तरावर देखील मानधनाबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे, पण प्रश्न सुटला नाही. अखेर आज मागणी लावून धरण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली