LOKSANDESH NEWS
राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने पालखी महोत्सवाचे आयोजन
- कोकणात शिमगोत्सवाची प्रत्येक गावची वेगळी प्रथा, परंपरा आहे. वेगवेगळ्या गावांच्या शिमगोत्सवातील या प्रथा, परंपरा नागरिकांना एकाच ठिकाणी पाहता याव्यात, कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा,
या लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी राजापूर तालुक्यामध्ये राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 8 गावच्या पालख्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच 1 टिपरी खेळे, 3 गोमुचा नाच यावेळी सादर करण्यात आले.
सहभागी गावाने आपल्या पालखीसह खेळे, ढोल ताशांसह पारंपारिक शिमगोत्सवातील कलाविष्काराचं सादरीकरण केले.
या महोत्सवामुळे वेगवेगळ्या गावचा शिमगोत्सव नागरिकांना एकाच ठिकाणी अनुभवता आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली