LOKSANDESH NEWS
भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचा खामगावात मोर्चा
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्याच ताब्यात असावे,
यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्याचप्रमाणे खामगाव येथे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदना मार्फत बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या
, अशी मागणी करण्यात आली आहे.