LOKSANDESH NEWS
| तरुणाची चाकू भोसकून हत्या, दोन तरुणांना अटक
चेंबूर परिसरात तरुणाला भोसकून हत्या झाल्याचे सीसीटीव्ही समोर आले होते. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी बारा तासांच्या आत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत
. वाढवली गावात राहणाऱ्या विघ्नेश चांदले आणि आरोपी सुमित अंबुरे ची जुन्या वादातून भांडणे झाली होती.
१० तारखेला रात्री सुमित ने विघ्नेश ला जरिमरी मंदिराजवळ बोलावले.
तेव्हा त्याने सोबत अट्टल गुन्हेगार ओंकार मोरेला त्याची हत्या करण्याच्या उद्देशाने आणले. ओंकारने या वेळी विघ्नेश आणि त्याचा भाऊ प्रथमेश वर चाकूने हल्ला केला. यात विघ्नेश चा मृत्यू झाला.
या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अवघ्या १२ तासात सुमित आणि ओंकार ला गोवंडी मधून अटक केली आहे.