LOKSANDESH NEWS
जालन्यातील शिवाजी महाराजांचा बॅनर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल, एक जण ताब्यात
जालन्यातील कन्हैय्यानगर भागातील शिवाजी महाराजांच बॅनर काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बॅनर काढणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे. विठ्ठल जुमरे असे बॅनर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय.
व्हिडीओत हा तरुण बॅनर काढताना दिसून येत असून, दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने बॅनर काढणाऱ्या जुमरेला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. दरम्यान,
आरोपीवर आता कारवाई करण्यात आल्याने कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली