LOKSANDESH NEWS
डोंबिवली घरडा सर्कल परिसरात वाहतुकीत मोठा बदल; घरडा सर्कल परिसरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ शिल्पाचे लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या १७ मार्च रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत पार पडणार आहे
. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक, मान्यवर आणि प्रशासन अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने या चौकात मोठी वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासाठी नियोजन म्हणून वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज रात्री १० पासून उद्या रात्री ११ वाजेपर्यंत घरडा सर्कलकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. या कालावधीत घरडा सर्कल परिसरात जाणे टाळावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आव्हान करण्यात येत आहे.
वाहतुकीसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना:
- डोंबिवली शहरातून घरडा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
- पर्यायी मार्ग: शिवम हॉस्पिटलपासून जिमखाना रोडमार्गे प्रवास करावा
- सुयोग रिजन्सी मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
- पर्यायी मार्ग: आर. आर. हॉस्पिटलपासून कावेरी चौक, एमआयडीसी मार्गे वाहतूक सुरू राहील
- खंबाळपाडा रोड, ९० फीट रोड, ठाकुर्ली रोडमार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
- पर्यायी मार्ग: बंदिश पॅलेस हॉटेलपासून सावित्रीबाई फुले नाट्यगृह मार्गे वाहतूक सुरू राहील
- आजदे गाव, आजदे पाडामार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
- पर्यायी मार्ग: एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांद्वारे प्रवास करावा
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली