- राहनाळ ग्रामपंचायतीतील चरणी पाडा येथे भिवंडी आगरी समाज उन्नती मंडळाच्या वतीने उभारलेल्या कै. किशोर आर. सी. पाटील आगरी भवनाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि माजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष आर. सी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
या सोहळ्यास खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते विश्वास थळे, मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
. या नव्या भवनामुळे आगरी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून, समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली