सरकार मधील नेते वादग्रस्त विधान करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहेत - अनिल देशमुख
नागपूरच्या हिंसाचारामागे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. सरकार मधील नेते वादग्रस्त विधान करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहेत, असे अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे.
तर ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना खडसावलं पाहिजे असं ते म्हणाले आहे. गेल्या काही दिवसांतील फडणवीस मंत्रिमंडळातील काही मंत्री, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. नागपुरात सर्वात आधी शांतता प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहे.
त्यानंतर या विषयावर राजकारण करता येईल असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली