LOKSANDESH NEWS
| रत्नागिरी - नागपूर महामार्गा विरोधातील आंदोलनामुळे कोल्हापूर पोलिसांनी राजू शेट्टींना घेतले ताब्यात
रत्नागिरी - नागपूर महामार्गातील शेतजमीनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या व कृष्णा नदीवरील होणाऱ्या नवीन पुलामुळे उमळवाड , कोथळी , सांगली शहर , धामणी , समडोळी कवठेपिराण , सांगलवाडी , हरिपूर , दानोळी , कवठेसार , हिंगणगांव , कुंभोज दुधगांव सावळवाडी माळवाडी ,किणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे.
कृष्णा नदीवर फक्त ६ पिलरचा पूल प्रस्तावित केला असून बाकी सर्व ३ किलोमीटर भराव होणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांच्या कडून राजू शेट्टींना त्यांच्या शिरोळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.
मात्र कोणत्याही परिस्थितीत रस्ता रोको आंदोलन करणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली