बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातील एसटी बस ही आज सकाळी वानखेडे गावात नित्य नियमाप्रमाणे गेली असता तेथील एका वेडसर इसमाने एसटी बसच्या मागील बाजूवर हातोडी आणि दगडांचा मारा करून काचा फोडल्या आहेत.
ही घटना सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेमध्ये प्रवासी जखमी झाले नाहीत. शेगाव आगाराची एसटी बस सकाळी साडेसात वाजता शेगाव वरून वानखेड कडे निघाली.
प्रकाश पिंजरकर नावाच्या इसमाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाल्याने जवळपास पंधरा वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे. अनेकदा त्याने पोलिसात निवेदनही दिलेत.
मात्र, आज सकाळी प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव-वानखेड या बसच्या हातोडीच्या सहाय्याने मागच्या काचा फोडल्या व पोलीस प्रशासनाने माझी पत्नी आणून द्यावी अशी मागणी केली. सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून अद्याप पोलीस पोचलेले नाहीत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली