LOKSANDESH NEWS
खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
ON सामना रोखठोक
- हा देश विभाजनाकडे चालला आहे. 1947 च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत मला फार फरक दिसत नाही
- जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशात काही लोकांनी परिस्थिती निर्माण केली
- जेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला त्या पंडित नेहरू यांचे मान्य होते भारताचा मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही
- आज दुर्दैवाने हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांच्या स्वतःवरचे नियंत्रण संपलेले आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं, मशिदींवर हल्ले करणे, हिंदू तरुणांची डोकी भडकवणं
- या महाराष्ट्रामध्ये 3000 च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक आणि एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का? बजरंग दल असेल, विश्व परिषद असेल, शेतकरी मेले जे हिंदू नाही का? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये 3000 च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू इच्छिणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख यांना या देशाचे नाव बदलायचे आहे
- शिवसेना हिंदुत्ववादी संघ पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी हा विषय घेऊन राजकारणात आलो. लोकांच्या पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करत बसले आहेत
- महाराष्ट्र हा पेटवायला निघाले आहेत काहीजण
- अशाने या राज्याची राखरांगोळी, हे राज्य नष्ट होईल.
- हे राज्य नष्ट व्हावं हे काही लोकांना सुपारी देऊन भाजप मध्ये पाठवले आहे का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला हाफ चड्डी वाले म्हणून बोलत होते, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना शिव्या घालत होते, ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत
- हिंदू मुसलमान यांला मटणाचं दुकान वेगळं आणि त्याला मटणाचा दुकान वेगळं. देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर हे सहन कसे करतात?
ON औरंगजेब कबर
- यांनी कुठे केली बाबरीची पुनरावृत्ती? हे पळून गेले, आम्ही होतो. आमच्यावर अजून खटले सुरू आहेत. हे कुठे होते? हे जे म्हणत आहेत आम्ही हे करू ते करू 400 वर्षांपूर्वीची कबर खोदायला निघाले आहेत. म्हणून म्हणत आहे 3000 शेतकऱ्यांच्या चिता जळाल्या आहेत त्याच्यावर बोला
- कश्मीर मधला तरुण दंगलखोर का झाला? कारण त्याच्या हाताला काम नाही
- लक्ष हटवण्यासाठी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावला
- मी उदय सामंत यांचे अभिनंदन करतो. त्यांनी राजापूर मध्ये संयमाची भूमिका घेऊन दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण झाले होता तो संपवायचा प्रयत्न केला
- कोकणात अशा दंगली कधी घडवल्या होत्या, हे काल आलेले लोक हिंदुत्वाच्या नावावर आणि दंगली घडवत आहेत
- कोकणात हिंदू मुसलमान यांच्या नावावर कोकणाची राखरांगोळी करायची आहे का?
- मी आज वाचलं उदय सामंत यांनी संयमाची भूमिका घेतली. राजापूर आणि रत्नागिरी भागात आणि त्यांनी दोन्ही समाजामध्ये जो तेढ निर्माण काही लोकांनी केलं होतं ते नष्ट केलं
ON नरेश म्हस्के
- ते जे रोजगार त्यांनी जावं तसे आम्ही गेलो होतो
- अयोध्येत बाबरीसाठी त्या काळात मी होतो. बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश होता तसं त्यांनी जावं त्याच्या पक्षाला जसा आदेश असेल त्यांचे पक्षप्रमुख अमित शाहा आहेत त्यांचे पक्षप्रमुखांचे आदेश असेल तर त्यांनी जावं
- 400 वर्षांपूर्वीच्या कबर खोदायला निघाले आहेत आणि महाराष्ट्राची कबर होताना दिसत आहे
- थडगं होताना दिसत आहे, 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली