LOKSANDESH NEWS
तरोडा ग्रामवासीयांच्यावतीने आमदार संजय गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार व लाडू तुला
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची दुसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा समस्त गावकरी मंडळी बुलढाणा मतदारसंघातील तरोडा येथे भव्य नागरिक सत्कार सोहळा तसेच लाडू तुला आयोजित करण्यात आला.
यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करून आमदार संजय गायकवाड यांचे गावांमध्ये ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले
. तर जेसीबी मधून आमदार संजय गायकवाड यांच्या वर फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी तरोडा गावातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली