आयुष्यमान आरोग्य मंदिर तामसा येथे महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान आरोग्य मंदिर तामसा येथे महिलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. मंजुषा आढाव/मुरमुरे, उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच आयोजन हादगाव चे तालुका आरोग्य अधिकारी
डॉ संजय मुरमुरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिर मध्ये गर्भाशय कॅन्सर तपासणी, सिकलसेल तपासणी, रक्त तपासणी, 100 दिवस निक्षय टीबी, गोल्डन कार्ड, इत्यादी तपासणी करून उपक्रम राबविण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये ,प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील सर्व अधिकारी कर्मचारी गटप्रवर्तक व सर्व आशा वर्कर अंगणवाडी पर्यवेक्षक व सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी उपस्थित राहून आरोग्य आरोग्य तपासणी करून घेतली. या कार्यक्रमाचे नियोजन तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी . रामदास बोंदरवाड व सर्व कर्मचाऱ्यांनी केले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली