LOKSANDESH NEWS
महिंदळे शिवारातील शेताला भीषण आग, आगीत पक्षी जळून खाक
धुळे शहरातील महिंदळे शिवारातील हॉटेल कृष्णाइच्या पाठीमागे असलेल्या शेताला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लागलेल्या या भीषण आगी मध्ये शेतात असलेल्या पशुपक्षी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच धुळे मनपाच्या अग्निशामक दलाच्या 7 ते 8 गाड्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
मोकळ्या असणारे या शेताला अचानक आगीचा वणवा पेटला. कालांतराने आग वाढतच चालली होती. मात्र मनपाच्या अग्निशामक दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली आहे. आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नसले तरी या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात पशू पक्षी या आगीत जळून त्यांचा मृत्यू झाला आहे.