कार चोरी करणारा आंतरराज्यीय टोळीतील अट्टल गुन्हेगार अजय कटवाल उर्फ नेपाळी जेरबंद
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय टोळीतील घरफोडी व चारचाकी वाहने चोरी करणार्या सराईत गुन्हेगाराला शिताफिने जेरबंद केले.
अजय प्रताप कटवाल ऊर्फ नेपाळी याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किंमतीची बनावट नंबर प्लेट असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून आरोपी अजय कटवाल याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी अजय कटवाल उर्फ नेपाळी याच्यावर दोंडाईचा, नांदगाव पेठ (अमरावती), अंबरनाथ व उल्हासनगर (ठाणे) पोलिसात प्रत्येकी एक, मोहाडीनगर 2 , चिपळून (जि. रत्नागिरी) 3, विश्रामबाग (सांगली) 2, रामनगर (वर्धा), गाडगे नगर (अमरावती) पोलीस ठाण्यांत 2 असे आर्म ऍक्ट, चोरी, घरफोडीचे गुन्हे तर मध्यप्रदेश राज्यात विविध ठिकाणी चारचाकी चोरीचे असे विविध गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती पोलिसांनी यावेळी दिली.