LOKSANDESH NEWS
दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगावपारी परिसरामध्ये कांकरिया लॉन्स जवळ प्रणव शिंदे व त्याचा मित्र विनय नेरकर हे दोघेही आपल्याजवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आपल्या पथकाला आदेश दिले व धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तरुणांची झाडाजळती घेतली असता प्रणव शिंदे यांच्या कमरेला बनावट गावठी पीस्टल आढळून आले तर विनय नेरकर यांच्या खिशात मॅक्झिम व एक जिवंत काडतूस आढळून आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयित दोघांना ताब्यात घेतले असून या दोघा आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे हे पिस्टल कुठून व कसे आले तसेच अजून कोणत्या गुन्ह्यात याचा सहभाग आहे का.?
याचा कसून तपास आता धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.