LOKSANDE3SH NEWS
श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा, तालुका सिल्लोड येथील श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान तर्फे पैठण येथील नाथषष्टी महोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे पालखी महोत्सव पैठण कडे निघाली. या पालखी महोत्सवाचे हे 48 वे वर्ष असून, दरवर्षी या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आसतो. ही दिंडी दिनांक 10-3-2025 श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा इथून निघाली
. दिनांक 22-3-2025 पर्यंत ही दिंडी पैठण येथे असणार आहे. सिद्धेश्वर संस्थांतर्फे या दिंडीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दिंडी धोत्रा येथून निघाल्यानंतर गोळेगाव, लिहा खेडी, सिल्लोड, आळंद, फुलंब्री, चौका, छत्रपती संभाजीनगर, कांचनवाडी, बिडकीन, ढोरकीन व नंतर पैठण अशा मार्गाने जाणार असून, ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत सिद्धेश्वर भक्ता तर्फे करण्यात येते.
तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ, चहा, नाष्टा व भोजनाचीही व्यवस्था करण्यात येते. या दिंडीमध्ये पंचक्रोशी सह तालुक्यातील, जिल्ह्यातील व महाराष्ट्रभरातील भाविक सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली