वार्ड क्रमांक 10 मधील नागरिकांचा संताप; शिवदात अपार्टमेंटजवळ तीन महिन्यांपासून उघडा ड्रेनेज खड्डा
वार्ड क्रमांक 10 मधील तात्यासाहेब मळा परिसरात शिवदात अपार्टमेंटच्या मुख्य दाराजवळ गेल्या तीन महिन्यांपासून एक उघडा ड्रेनेज खड्डा तसाच ठेवण्यात आला आहे. या खड्ड्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
लाकूड वखारजवळ असलेला हा खड्डा सार्वजनिक आरोग्यासाठीही धोकादायक ठरत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असताना, या खड्ड्यात पाणी साचण्याची शक्यता असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचीही भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महापालिका कार्यालयाकडे तक्रार केली असून देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. "महापालिकेचे अधिकारी झोपले आहेत का? कोणीतरी या खड्यात पडायची वाट बघत आहेत का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन या खड्ड्याचे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली