LOKSANDESH NEWS
13 वर्षीय शिव नवीन पटेल याचा पाण्यात बुडून मृत्यू
कोल्हापूर: टिंबर मार्केट, कोल्हापूर येथील 13 वर्षीय युवक शिव नवीन पटेल याचा आज (दिनांक १६ एप्रिल, २०२५) दुर्दैवी मृत्यू झाला. तो पथडी खन येथे पोहण्यासाठी गेला असताना त्याला दमछाक झाली आणि तो पाण्यात बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तसेच आपदा मित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित शोधकार्य सुरू केले. गळाच्या साहाय्याने अथक प्रयत्नानंतर शिवचा मृतदेह पाण्यामधून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली