बुलढाण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील विविध भागातून दरवर्षीप्रमाणे भीम अनुयायांनी भीम जयंती साजरी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसून आले आहे.
शहरातील अनेक भागातून रॅली आणि मिरवणूक काढत भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय.
यावेळी फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. तर यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उसळलेल्या जनसागरास शुभेच्छा दिल्या आहेत तर यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होत भीत नाही कुणाच्या बापाला आम्ही भिमाची पोर या गाण्यावर आमदार गायकवाड यांनी ताल धरला आहे.