अलिबाग मध्ये लाल बावट्याचे वादळ घोंगावले, हजारो शेकाप कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी घेतली भव्य सभा
अलिबाग मध्ये आज शेतकरी कामगार पक्षाचे लाल बावट्याचे वादळ घोंगावताना दिसून आले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार पंडित पाटील यांनी आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांच्यासह आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत आज प्रवेश केला.
त्यानंतर सकाळपासूनच शेकापच्या कार्यकर्त्यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गर्दी करून आम्ही श्वास असेपर्यंत शेकाप व लाल बावट्याशी इमान राखू असा विश्वास जयंत पाटील यांना देण्यासाठी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी लाल बावटा खांद्यावर घेऊन पुन्हा पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची अलिबागेत भव्य सभा पार पडली. या सभेत कार्यकर्त्यांचा जोश व उत्साह पहावयास मिळाला. भाई जयंत पाटील आप आगे बढो हंम तुम्हारे साथ हे, चित्राताई आप आगे बढो हंम तुम्हारे साथ हे,
शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, लाल बावटे की जय, अशा गगनभेदी घोषणांनी अलिबाग दणाणून सोडले. या सभेत पक्ष संघटना वाढीसाठीची पुढची रणनीती आखण्यात आली. या सभेला शेकाप नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिशादर्शक व कार्यकर्त्यांत जाण फुंकणारे मार्गदर्शन केले. यावेळी शेकाप नेत्या मानसीताई पाटील, चित्रलेखा पाटील , सुरेश खैरे यांनी संबोधित केले.