महिलांच्या नावावर लोन काढून आयफोन्स खरेदी करणाऱ्या 2 दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मानखुर्द च्या साठे नगर परिसरामध्ये 65 महिलांचे कागदपत्र घेऊन त्यांच्या नावावर कंजूमर लोन काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या महिलांना त्यांच्या कागदपत्रांच्या बदल्यात चार ते पाच हजार रुपये देण्यात आले आणि त्यानंतर या महिलांचे डॉक्युमेंट्स बजाज फायनान्स कंपनीमधील कर्मचाऱ्यांना देऊन या डॉक्युमेंट्स वर कंजूमर लोन काढण्यात आली. या लोन च्या माध्यमातून विविध ठिकाणी आयफोन्स खरेदी करण्यात आले आहेत. सदर प्रकरणाची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळताच पोलिसांनी सुमित गायकवाड आणि राजू बोराडे या दोघांना ताब्यात घेतल आहे. हे दोघे या महिलांकडून कागदपत्र खरेदी करून त्या बदल्यात त्यांना चार ते पाच हजार रुपये देत असत आतापर्यंत वीस लाख 7000 रुपयांचे लोन या महिलांच्या नावावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या सोबतच आणखीन तिघांचा शोध सध्या मानखुर्द पोलीस घेत आहेत.
यामध्ये बजाज फायनान्स मधील काही कर्मचाऱ्यांचा देखील हात असल्याचं पोलिसांचा संशय आहे त्यानुसार पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान या संदर्भात लाडक्या बहिणीसारखी एखादी योजना आली असल्याचे सांगून या भामट्यांनी कागदपत्रे घेतली असे म्हटले जात आहे परंतु पोलिसांनी असे काही अँगल असल्याचे नाकारले आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली