बिहार येथे असलेले बौद्धगया महाबोधी विहार हे जागतिक बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च असे स्थान आहे. तथागत गौतम बुद्धांना या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली आणि म्हणूनच हे स्थळ बौद्ध अनुयायासाठी पवित्र स्थान मानले जाते. परंतु 1949 च्या बौद्धगया मंदिर व्यवस्थापन अधिनियमानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या व्यवस्थापनात बौद्ध धर्मीयांना संपूर्ण अधिकार नाही.
हे महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात असावे या मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव येथे विराट शांती मोर्चा काढण्यात आला.
सदर शांती मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथून अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयापर्यंत विविध घोषणा देत काढण्यात आला. सभेच्या माध्यमातून बोधगया मंदिर व्यवस्थापन अधिनियम 1949 हे पूर्णपणे रद्द करण्यात यावे आणि नवीन कायदा करून त्यामध्ये संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांकडे देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली