सिंधुरत्न योजना तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच खरीप हंगाम 2025 पूर्वतयारी आढावा बैठक राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली खेडमध्ये पार पडली. यावेळी लाभार्थ्यांना आंब्यावरील फलमाशीपासून संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत रक्षक सापळे वाटप तसेच शेतीपिकांचे वन्य व भटके प्राणी यांपासून संरक्षणसाठी प्रतिबंधक औषध वाटप राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं.
तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत खेड तालुक्यातील एकूण 50 लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत 2 कोटी 52 लक्ष रुपये अनुदान वाटपही करण्यात आलं.
तसेच 28 लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत विविध शेती औजारासाठी 9 लक्ष 56 हजार अनुदान वाटप करण्यात आलं. तसेच 564 लाभार्थ्यांना गाय/म्हैस दुधाळ गट, साठी निवडपत्रे देण्यात आली. मतदारसंघातील कृषी व कृषी निगडीत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वकष विकास आराखडा सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने तयार करण्याच्या सूचना यावेळी मंत्री योगेश कदम यांनी दिल्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली