लग्नाच्या जेवनातून 27 लोकांना विषबाधा, गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथील घटना

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लग्नाच्या जेवनातून 27 लोकांना विषबाधा, गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथील घटना

   LOKSANDESH NEWS       

 लग्नाच्या जेवनातून 27 लोकांना विषबाधा, गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथील घटना

         लग्नाच्या जेवनातून 27 लोकांना विषबाधा झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडली आहे. गोरेगाव तालुक्यातील बबई येथील केशोवराव बिसेन यांच्याकडे लग्न समारंभ होता. या लग्न समारंभातून जवळपास 27 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

 यामध्ये 8 बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक असलेले त्यांना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

तर उर्वरित 17 लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली