बनेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळालाय, 2 तारखेला रस्त्याचं भूमिपूजन करणार - सुप्रिया सुळे
- महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत
- महाराष्ट्राची सामाजिक चळवळ आणि भारताला शिक्षा देण्याचे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं
- या महात्मा फुले वाड्यामध्ये दरवर्षी आम्ही येतो
- महात्मा फुले यांनी भारताला दिलेली वैचारिक विचारधारा, सामाजित परिवर्तन याच्यातून काहीतरी घेऊन समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे
- आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो
- खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची चौकशी झाली पाहिजे
- मला विश्वास आहे तमिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री स्टॅलिन याच्यावर ॲक्शन घेतील
- प्रशासनाचा अंतर्गत विषय सरकारने सोडवला पाहिजे
- मला त्या चित्रपटाविषयी माहिती नाही. मात्र, मी आत्ताच छगन भुजबळ यांना भेटले
- ही दोन पुस्तकं त्याचा उल्लेख भुजबळ यांनी केला
- पवार साहेब मुख्यमंत्री असताना हे पाहिलांदा पुस्तक काढण्यात आलं
- त्याच्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक काढलं
- ते पुस्तक मला आत्ता भुजबळ यांनी दिलं. पवार साहेबांसाठी मी भुजबळांचे मनःपूर्वक आभार मानते
- पवार साहेबांसाठी त्यांनी एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे
- हे पुस्तक हा विचार महाराष्ट्रातील नवीन पिढीच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे
ON बनेश्वर रस्ता
- मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते
- हा विषय राजकीय नाही आमच्या श्रद्धेचा विषय आहे
- त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक भूमिका घेते त्याचे मी मनापासून स्वागत करते
- बनेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळालाय
- 2 तारखेला रस्त्याचं भूमिपूजन करणार
ON एसटी कर्मचारी वेतन
- माझी सरकारला विनंती आहे की, जे गरीब कष्ट करणारा आहे. त्या गरीब, कष्ट करणाऱ्याला न्याय हा मिळालाच पाहिजे
- कुठल्याही गरीब कष्ट करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे
ON अमित शाह महाराष्ट्र दौरा
- देशाचे गृहमंत्री आहेत
- एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठेही जायचा अधिकार आहे
- ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथि देवो भव, त्यांचे स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे
- ते देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात असे आपल्या राज्यांमध्ये आले
ON महिला अत्याचार
- महिलांवर अत्याचार होणाऱ्या घटनेमध्ये प्रचंड वाढ होत आहे, यामध्ये मी गृहमंत्र्यांना विनंती देखील केली
- ऑल पार्टी मिटींग बोलवा, महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे
- ही वारंवार मागणी मी सरकारकडे केली आहे
ON एसटी कर्मचारी
- हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला हवा
- हा असंवेदनशीलपणा कशासाठी? गरीब कष्ट करणारा एसटी कर्मचारी त्याचा हातावरचे पोट आहे. एखादा महिना पगार नाही भेटला तर तो काय करेल
- माझी सरकारला विनम्र विनंती आहे की, या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पगार वेळेवर झालेच पाहिजेत
ON मंगेशकर कुटुंब
- मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही
- त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही
- मात्र पूर्ण मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशासन या सर्व घटनेसाठी जबाबदार आहे
ON महापुरुष अपशब्द कायदा
- इतिहासावर भूमिका इतिहासकारांनी घेतली पाहिजे
- मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याच्यात गल्लत करू नये
- याच्यामध्ये इतिहासकारांचे मार्गदर्शनाचे योग्य राहील
- महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव द्यावा आम्ही त्याच्यावर सगळेजण चर्चा करू
- अर्थातच महापुरुषांबद्दल कोणीही चुकीचा शब्द काढला तर कायदा होईल तेव्हा होईल
- आजही महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही