सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका, शेतकऱ्यांचे 30% नुकसान
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड केली होती. हे पीक कापणीसाठी आले असतानाच निसर्गाने आपली करवट बदलली आणि वादळी वाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. शेतकऱ्याच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील मका पीक वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर आडवे झाले आहे.
या वादळामुळे शेतकऱ्यांचे जवळपास 25 ते 30 टक्के नुकसान झाले असून, त्यावर अद्याप कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही.
शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेले असताना ना कर्जमाफी मिळाली, ना बोनस. आता निसर्गाच्या कोपामुळे मका पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली