LOKSANDESH NEWS
बिबट्याने पाडला तीन जनावरांचा फडशा, बुलढाण्यातील क्रीडा संकुल परिसरातील घटना
बुलढाणा शहर अजिंठा पर्वत रांगेत वसलेले आहे, आणि या शहराला तीन बाजूने ज्ञानगंगा अभयारण्याने वेढलेले आहे, या अभयारण्यात विविध हिंस्र प्राणी वास्तव्यास आहेत,
यापैकी अनेकदा अस्वल, बिबट्याचे जनावर आणि माणसांवर देखील हल्ल्याच्या घटना घडत असतात, अशातच रात्री एका बिबट्याने तीन जनावरांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.
क्रीडा संकुल हा परिसर जंगलाला लागूनच असल्याने बरेचदा या ठिकाणी जनावरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली