धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले जवळपास 30 मोबाईल हँडसेट आणि काही स्मार्टफोन धुळे शहर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा गौरव देखील यावेळी केला. विविध ठिकाणाहून चोरी झालेले आणि हरविलेले एकुण 30 मोबाईल हँडसेट फोन एक महिन्याच्या आत पोलिसांनी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सेन्ट्रल इक्युल्पमेंट आयडन्टी रजिस्टेशन द्वारे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलिसांच्या पथकाने हा तपास केला आहे. पोलिसांनी विविध कंपनीचे 30 स्मार्टफोन गुजरात, आसाम, मध्यप्रदेश, राजस्थान, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव व मालेगाव अशा जिल्ह्यातून हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली