राष्ट्रवादीच्या एकीकरणा संदर्भात खासदार सुनील तटकरे यांच मोठ विधान
राष्ट्रवादीच्या एकीकरणा संदर्भात सुनील तटकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे.
अजित पवार व शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी यासाठी मी विठुरायाला कोणतेही मागणं घातलेलं नाही, आणि ते घालण्याचं कोणतं कारण ही नाही. असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळून एन.डी.ए. सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच्या राजकीय भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यात आम्हाला यश मिळत राहो. या विचारांशी जे असतील त्यांच्या सोबत आहोत .
सुनिल तटकरे आज सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शना नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुनिल तटकरे यांच्या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.