LOKSANDESH NEWS
गोंदिया जिल्ह्यात मक्याला 5000 रुपये क्विंटल दर मिळावा, शेतकरी व मजुरांची मागणी
गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र, सततच्या तोट्यामुळे पर्यायी पीक म्हणून यंदा अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे. सध्या मका पीक कापणीच्या अंतिम टप्यात असून, शेतकरी व मजुरांमध्ये मका पिका भविष्याबाबत उत्सुकता आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, धानाच्या तुलनेत मक्याला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मक्याला किमान 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे, कापणीच्या कामामुळे मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला असून 160 रुपये रोजंदारीवर मजूर काम करत आहेत. दर मिळाल्यास केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर मजुरांच्याही रोजीरोटीचा प्रश्न सुटेल, असे मत मजुरांनी व्यक्त केले. शेतकरी व मजूर यांना योग्य भाव व रोजगार मिळावा, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली